दौंड : दौंड पोलिसांनी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास गुटखा वाहतूक करणारा ट्रक पकडून सुमारे ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १६/१२/२०२४ रोजी रात्री १२:०९ वाजण्याच्या सुमारास एका इसमाने डायल ११२ वर कॉलकरून दौंड कुरकुंभ हायवे रोडने एक संशयित ट्रकमध्ये गुटख्याची तस्करी होत असलेबाबत कॉल केला होता. प्राप्त झाल्याने सदरकॉल बाबत पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांना माहिती देवून दौंड पोलीस स्टेशन कडील सपोनि नागनाथ पाटील, पो.कॉ पवन माने, पो.कॉ कुलकर्णी, पो.कॉ फडणीस यांनी गोलराउंड दौंड येथे दौंड कुरकुंभ रोडवर एक अशोक लेलँड कंपनीचा ६ टायर ट्रक क्र. के ए २९ ए २५८८ हा पकडुन त्यावरील चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव रवि अर्जुन होळकर (वय ३४ वर्षे रा. कासुर्डी ता. दौंड जि. पुणे) असे सांगीतले त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने ट्रकमध्ये गुटखा वाहतुक करीत असल्याचे सांगीतले.
सदर ट्रकचे पाठीमागे ठेवलेल्या मालाची पाहणी केली असता ट्रकमध्ये पोत्याच्या गोण्यात माल भरलेला दिसुन आला. त्याचा उग्र व सुगंधीत वास आल्याने सदरचा माल हा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या पान मसाला गुटखा असल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी सदर ट्रकची पाहणी केली असता खालील वर्णनाचा माल मिळुन आला आहे.
१) ४,५९,८००/- रूपये किं. ची १९ पोती त्यावर आर एस २ असे लिहीलेले पोत्यामध्येवि १ तबांखु, एका पोत्यामध्ये ५ पोती, त्यामध्ये १० लहान पोती व एकापोत्यामध्ये २२ पाउच एका पाउचची किंमत २२ रूपये असलेली.
२) २,२४,६४०/- रूपये किं. ची ९ पोती त्यावर आर एस ४ असे लिहीलेले पोत्यामध्येकेसरयुक्त विमाल पान मसाला, एका पोत्यामध्ये ४ पोती, त्यामध्ये ५२ पाउचएका पाउचची किंमत १२० रूपये असलेली.
३) १,३७,२८०/- रूपये किं. ची ४ पोती त्यावर आर एस १.५ असे लिहीलेले पोत्यामध्येवि – १ तंबाखु, एका पोत्यामध्ये ५ पोती, त्यामध्ये ४ लहान पोती, एकापोत्यामध्ये ५२ पाउच एका पाउचची किंमत ३३ रूपये असलेली.
४) ५,८३,४४०/- रूपये किं. ची १५ पोती त्यावर आर एस ८.५० असे लिहीलेलेपोत्यामध्ये केसर युक्त विमल पान मसाला, एका पोत्यामध्ये ४ पोती, एकापोत्यामध्ये ५२ पाउच एका पाउचची किंमत १८७ रूपये असलेली.
५) ४०,९४,६४०/- रूपये किं. ची ९४ पोती त्यावर आर एस १८ असे लिहीलेले पोत्यामध्ये केसर युक्त विमल पान मसाला, एका पोत्यामध्ये १० पोती, एकापोत्यामध्ये २२ पाउच एका पाउचची किंमत १९८ रूपये असलेली.
६) १०,००,०००/- अशोक लिलन्ड कंपनीचा ६ टायरचा ट्रक क्र. के ए २९ ए २५८८ जु.वा. कि. अं. ६४,९९,८००/- रूपये एकुन किंमतीचा मुददेमाल जप्त करून दौंड पोलीस स्टेशन येथे यातील ट्रक चालक व मालकयांचेविरुध्द गुन्हा ८९१/२०२४ भा. न्या. सहिता कलम १२३, २२३, २७४, २७५, अन्न सुरक्षा मानके अधिनियम्२००६ व नियमन २०११ चे कलम २६ (२) (प), २६ (२) (पअ), २७ (३) (डी), २७ (३) (ई), ५९ (प) (प) (प)प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. पंकज देशमुख साो, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. गणेश बिरादार सो,बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापुराव दडस सो दौंड उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसनिरीक्षक श्री.संतोष घोळवे साो, सहा. पोलीस निरीक्षक श्री. नागनाथ पाटील साो, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुनिल उगले,पोलीस उपनिरीक्षक रुमेश कदम, पो. हवा / एस. डी. राउत, पो.हवा/ नितीन बोराडे, पो. हवा निखील जाधव, पो.हवा. अमिरशेख, पो. हवा. पांढरे, पो. हवा महेश भोसले, पो.कॉ संजय कोठावळे, पो.कॉ. पवन माने, पो.कॉ. एच. एस. कुलकर्णी, पो.कॉ.रमेश कर्चे, पो.कॉ.फडणीस, पो.कॉ नितीन दोडमिसे यांनी मिळुन करवाई केली आहे.