Daund | विजेच्या लपंडावाणे ‘पारगावकर’ त्रस्त, आंदोलनाचा इशारा

विकास शेळके

खुटबाव प्रतिनिधी : विजेच्या लपंडावामुळे शेतकरी अक्षरशा त्रस्त झाल्याचे चित्र दौंड तालुक्यात पाहायला मिळत असून पारगाव (ता. दौंड) या पंचक्रोशीतील शेती पंपाचा विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने विजे अभावी पिके जळू लागली आहेत.

शेतकऱ्यांना विजेचा प्रश्न भेडसावत असून दिवसातून अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होतो त्यामुळे ऊस लागवडीची कामे, तरकारी, जाणवरांचे खाद्य याचे गणित कोलमडत आहे. या सर्व प्रकाराला वैतागून पारगाव ग्रामस्थांनी बैठक घेत दापोडी येथील महावितरण कार्यालयामध्ये त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची तक्रार निवेदनाद्वारे दिली आहे. वीज पुरवठा कमी दाबाने होत असून दिवसभरात एक ते दोन तास लाईट मिळते. रात्र पाळीला सुद्धा तीच परिस्थिती आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेली पिके जाळू लागली आहेत, अगोदरच या परिसरात बिबट्याचा वावर आहे त्यामुळे रात्रीच्यावेळी शेतीला पाणी देताना शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन पाणी द्यावे लागते. त्यातच विजेच्या खेळ खंडोब्यामुळे या परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ त्रस्त झाले असून त्यामुळे अगोदर येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. आणि तरीही वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर येत्या १२ तारखेला पारगाव ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या वतीने महावितरण कार्यालय वर मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती संभाजी (तात्या) दत्तात्रय ताकवणे, सुभाष वसंतराव ताकवणे यांनी दिली आहे.