वृत्तसेवा : सहकारनामा ऑनलाइन.
: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना सारख्या महामारीशी सामना करण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी लॉकडाउनची मोठी घोषणा केली आहे. देशाला याबाबत संबोधित करताना मोदी म्हणाले की जनतेने या अगोदरच्या जनता कर्फ्युच्या वेळी दाखवून दिले की देशावर ज्यावेळी कोणतही संकट येत तेव्हा संपूर्ण देश एकजुट होतो. करोनासारख्या महारोगानं जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवलं आहे. त्या राष्ट्रांकडं साधन आहेत पण हा आजार इतक्या वेगानं पसरत आहे की तयारीलाही वेळ मिळत नाही. त्यामुळे आज रात्रीपासून संपूर्ण ‛देश लॉकडाउन’ केला जात आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अगोदरच महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांशी संवाद करणार असल्याचं ट्विट करून सांगितलं होतं.अखरे पंतप्रधान मोदी यांनी लोकडाऊन ची भूमिका मांडत नागरिकांना घरातच राहण्यास सांगितले आहे. पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले मी करोनामुळे देशासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या महारोगाचा संसर्ग इतक्या झपाट्यानं होत आहे की, त्यांची साखळी तोडण्याशिवाय देशासमोर कोणताही पर्याय नाही. आगीसारखा हा आजार पसरत चालला आहे. त्यामुळे एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे तो म्हणजे एकमेकांपासून दूर राहणं आणि घरातच राहणं. आज रात्री बारा वाजेपासून २१ दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे. हा लॉकडाउन जनता कर्फ्यूसारखा नसेल. अत्यंत कडक पद्धतीनं लागू केला जाईल असेही मानण्यात येत आहे.
लॉकडाऊनमध्ये मात्र खाली दिलेल्या सेवा सुरू राहणार असल्याचे वृत्त गृमंत्रालयाकडून मिळत आहे.
.हॉस्पिटल व मेडिकल दुकाने
. बँका व एटीएम,
. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांच्या ने
आणसाठी सार्वजनिक वाहने
. अन्नधान्याची, भाजी व फळांची दुकाने
. दुधाचा पुरवठा
.स्वयंपाकाचा गॅस पुरवठा
. टेलिकॉम सर्व्हिस
. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया कार्यालये
. पेट्रोलियम
.वीज
. शासकीय लेखा व कोषागार आणि संबंधित
कार्यालये, वाणिज्य दुतावास आणि परकीय संस्थेची कार्यालये