मुंबई : सहकारनामा ऑनलाइन
– राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील शाळा, महाविद्यालय, व्यायामशाळा, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, जलतरण तलाव बंद राहणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी लोकांनी खबरदारी म्हणून काळजी घेऊन शक्यतो गरज नसेल तर प्रवास आणि गर्दी टाळली पाहिजे असे आवाहन केले आहे. पुणे आणि पिंपरी,चिंचवडमधील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं आहे. कोरोना व्हायरसमुळे घेतलेले निर्णय आज मध्यरात्रीपासून लागू केले जाणार आहेत. परीक्षा उशिरा घेण्यासंबंधी विचार केला जात आहे असं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.