CoronaVirus – पिंपळगाव पुन्हा कोरोनाच्या रडारवर, दोघांना कोरोनाची लागण



दौंड : सहकारनामा ऑनलाईन


दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथे पुन्हा दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. याबाबतची माहिती राहू येथील सरकारी रुग्णालयाचे डॉ.पांढरे यांनी दिली आहे.

काही दिवसांमध्ये राहू जवळ असणाऱ्या पिंपळगावमध्ये कोरोनाने आपले डोके वर काढले आहे. या अगोदर येथील एका कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाला होता.

आता पुन्हा दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याने पिंपळगावकारांच्या चिंतेत भर पडली आहे.