Corona Breaking… 90 पैकी 19 जण पॉझिटिव्ह : केडगाव आणि कासुर्डीत सर्वात जास्त रुग्ण, पहा कोणत्या गावात किती पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील 7 गावांमध्ये सुमारे 19 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे आणि यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ इरवाडकर यांनी माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार केडगाव पत्रा कंपनी 6, कासुर्डी 5, जावजीबुवाची वाडी 4, सहजपुर 1, नानगाव 1, वरवंड 1, मिरवडी 1, असे एकूण 90 पैकी 19 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत.

केडगाव आणि कासुर्डी मिळून 11 जण सापडल्याने या गावांतील रहिवाश्यांचे टेंशन वाढले असल्याचे दिसत आहे.

नागरिकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्यास कोरोना अजूनही उग्ररूप धारण करेल यात शंका नाही.