दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड तालुक्यातील कोरोनाची स्थिती भयावह होत चालली असताना शहराचाही विळखा वाढत चालला आहे.
आज सोमवार दि. 21 जुलै रोजी दौंड शहरामध्ये 109 सॅम्पल पैकी 22 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.
यामध्ये 14 पुरुष 8 स्त्रियांचा समावेश आहे. हे सर्वजण दौंड शहरातीलच असून यामध्ये शालिमार चौक 2, बंगला साईड 2, गजानन सोसायटी 2, गोवा गल्ली 4, कुंभार गल्ली 1, समता नगर 1, सुतारनेट 1, आंबेडकर चौक 1, भीम नगर 1 असे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. थोडक्यात या कोरोना व्हायरसने आता संपूर्ण शहरालाच विळखा घातला असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्यास याचा आणखीन फैलाव होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.