दौंड : स्व.रखमाबाई ताडगे प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे दरवर्षी प्रमाणे सकाळ सोशल फाउंडेशनचा तंदुरुस्त बंदोबस्त कार्यक्रम यवत पोलीस स्टेशन येथे आज राबविण्यात आला. यावेळी सर्व पोलीस बांधवांना चिक्की वाटप करण्यात आले.
यावेळी सहायक फौजदार गाडेकर, स.फौ. थिकोळे, स. फौ. बगाडे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पो.ना. रणदिवे आणि पो.शि. तात्यासाहेब करे यांनी स्व. रखमाबाई ताडगे प्रतिष्ठान/ अखिल भारतीय मराठा महासंघ आणि सकाळ सोशल फाउंडेशन चे आभार मानले. या कार्यक्रम प्रसंगी स्व. रखमाबाई ताडगे प्रतिष्ठान चे संस्थापक अनिल ताडगे, मराठा महासंघ चे जिल्हा उपाध्यक्ष तुषार शेळके, पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते अमोल धनवडे उपस्थित होते.
वरील दोन्ही संघटनांतर्फे दरवर्षी हा उपक्रम पुण्यात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि लक्ष्मी रोड या ठिकाणी गणपती विसर्जन मिरवणुकीत राबविण्यात येतो. पोलिसांना गणपती उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी खूप कष्ट व परिश्रम घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांना वेळेत जेवण देखील मिळत नाही त्यामुळे पोलीस बांधवांची ऊर्जा आणि उत्साह टिकून राहण्यासाठी सकाळ सोशल फाउंडेशन तर्फे हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो.