मुंबई : चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेबांचा अपमान केला आहे. निषेध म्हणून आता मुख्यमंत्री राजीनामे देणार का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी झी 24 तास च्या ब्लॅक अँड व्हाईट कार्यक्रमात बोलताना बाबरी पाडली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते कि ती आमच्या शिवसैनिकांनी पाडली मात्र त्यात शिवसेनेचा कसलाही सहभाग नव्हता आणि बाबरी पाडताना तेथे कुठलाही शिवसैनिक नव्हता त्यामुळे बाळासाहेबांनी बोललेल्या त्या गोष्टीला कसलाही अर्थ नाही असा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला असून खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा निषेध करत आता निषेध म्हणून मुख्यमंत्री राजीनामा देणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.