दौंड : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मिळालेल्या मशाल या नवीन निवडणूक चिन्हाचे दौंड मध्ये शिवसैनिकांनी पूजन केले. यावेळी शिवसैनिकांनी बाळासो ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या नावाचा जयजयकार करत आनंद साजरा केला.
पक्षाचे पदाधिकारी अनिल सोनवणे, संतोष जगताप, मा. नगरसेविका अनिता दळवी, कैलास शहा, नामदेव राहींज, बापू गायकवाड, अमोल जगताप, विक्रम इंगवले, दीपक शिर्के तसेच बहुसंख्येने शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी अनिल सोनवणे म्हणाले की, संपूर्ण दौंड तालुका उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला जरी नवीन निवडणूक चिन्ह दिले असेल तरी याचा अंधेरी मतदार संघातील पोट निवडणुकीवर फरक पडणार नाही.
शिवसैनिक मशाल हे चिन्ह घराघरांमध्ये पोहोचवतील असा विश्वास उद्धव ठाकरे यांना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हणत त्यांचा निषेध यावेळी करण्यात आला.