अख्तर काझी
दौंड : दौंड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तसेच दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांच्यावर दौंड पोलीस ठाण्यात दाखल झालेले विनयभंग, अॅट्रॉसिटी, मारहाण प्रकरण गाजत असताना आता त्यांच्या मुलावरही बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात बादशहा शेख यांच्या संपूर्ण परिवाराला बलात्कारात सहकार्य केल्याचा ठपका ठेवत आरोपी करण्यात आले आहे.
दौंड शहरासह राजकीय वर्तुळात खळबळ
विविध सूत्रांकडून व मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दौंड चे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसीम बादशहा शेख (रा. कुंभार गल्ली दौंड) असे त्याचे नाव असून त्याच्या विरोधात एका पीडित महिलेने दौंड पोलिसांकडे फिर्याद दिल्याने वसीम शेख याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला तर खुद्द बादशहा शेख, बादशहा शेख यांची पत्नी, त्यांचा मुलगा वसीम याची पत्नी, त्यांचा दुसरा मुलगा एजाज तसेच एजाज याची पत्नी अश्या सहा जणांवर बलात्कारात मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख व कुटुंबातील काही सदस्यांना ॲट्रॉसिटी व इतर गुन्ह्यात अटक झाली असताना मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने शहरासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दौंड पोलिसांच्या माहितीनुसार 19/11/2021 ते 22/8/2022 या काळादरम्यान आरोपी वसीम याने येथील एका 33 वर्षीय महिलेला तिच्या इच्छेविरुद्ध शहरातील कुंभार गल्ली, भैरवनाथ गल्ली, गजानन सोसायटी अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन व तिला पिस्तुलाचा धाक दाखवून तिचे अश्लील व्हिडिओ काढून व तुझ्या कुटुंबीयांना संपवून टाकण्याची धमकी देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले असल्याचे असे फिर्यादीमध्ये पीडित महिलेने नमूद केले आहे. या घटनेत आरोपीस कुटुंबातील इतर पाच जणांनी सहकार्य केले असल्याने त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.