सोशल डिस्टनसिंग न पाळल्याने सात वाईन शॉपवर गुन्हे दाखल



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

– जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांनी नियम व अटींचे पालन करून वाइन शॉप उघडण्यास परवानगी दिली आहे मात्र सोशल डिस्टनसिंगला हरताळ पाळून  बिनधास्त असलेल्या हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाइन शॉप मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी माहिती देताना सदर शॉप चालकांनी सोशल डिस्टन्सिंग, थर्मल स्क्रीनिंग आणि मास्कचा वापर केला नाही असे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील सात दारू दुकान वाइन शॉपवर गुन्हा दाखल करण्यात असल्याची माहिती दिली. यावेळी रोहित वाइन्स, एम.आर. वाइन्स, एशिएन वाइन्स, एस. एस. घुले वाइन्स, अजंठा वाइन्स, राजधानी वाइन्स तसेच  कुणाल वाइन्स या दुकानांवर गुन्हे दाखल केले असल्याचे सांगितले. हि कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप गाडे, पोलीस नाईक बेंद्रे, करपे यांच्या पथकाने केली.