मुंबई : सहकारनामा ऑनलाईन
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील ‘राजगृह’ या निवासस्थानावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यातील मुख्य आरोपीला पकडण्यात माटुंगा पोलिसांना यश आले आहे.
हा हल्ला 8 जुलै रोजी हिंदू कॉलनीत असणाऱ्या राजगृह या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानावर करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये राजगृहाबाहेर असणारी फुलझाडे, आणि कुंड्यांची तोडफोड करण्यात आली होती. तसेच राजगृहाच्या खिडक्यांच्या काचाही फोडण्यात आल्या होत्या.
ही सर्व घटना टिपणार्या CCTV ही हल्लेखोरांनी फोडत घटनास्थळावरून पळ काढला होता.
या हल्ल्याप्रकर्णी पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव विशाल मोरे उर्फ विठ्ठल काण्या असे असून तो कल्याण येथील रहिवासी असल्याचे समोर येत आहे.
राजगृह तोडफोड प्रकरणी या अगोदर उमेश सीताराम जाधव या आरोपीला अटक करण्यात आली होती.
तो मुख्य आरोपीला मदत करत होता असा त्याच्यावर आरोप आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या आरोपीला अटक करण्यात आली होती मात्र तरीही मुख्य आरोपी हा पोलिसांना सापडत नव्हता. मुख्य आरोपीच आता जेरबंद झाल्याने या तोडफोडी मागील धक्कादायक कारण समोर येणार आहे.