नवी दिल्ली : देशात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता केंद्रातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभुमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी १४ एप्रिल पर्यंत टोलवसूली स्थगित करण्यात आली असल्याची मोठी घोषणा केली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना केंद्रीय परिवहन मंत्रालयाने घेतलेला हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. कोरोनामुळे अत्यावश्यक सेवांना अडसर निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं गडकरी यांनी सांगितले आहे.