दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
कोरोनाशी सामना करताना 14 दिवसांचा कालावधी माझ्यासाठी खूप मोठा होता, कारण मी इतक्या दिवस सर्वांपासून, तालुक्यापासून दूर राहिलो याची खंत आहे पण मी आता लवकरच 3-4 दिवसात आपल्या सेवेत रुजू होईल अशी ग्वाही दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी फेसबुक live च्या माध्यमातून दौंडकरांना दिली आहे.
याबाबत आमदार राहुल कुल यांनी कोरोना व्हायरसचा इफेक्ट झाल्यानंतर पहिल्यांदाच नागरिकांशी संवाद साधला असून आपल्या 2 कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना यातून बाहेर पडण्यास जास्त कालावधी लागला असल्याचे त्यांनी सांगितले.
जनतेने कोरोनाबाबत घाबरण्याचे कारण नाही मात्र काळजी घेणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले. आमदार राहुल कुल यांच्या तब्येतीबाबत दौंडकरांना हूर हूर लागून राहिली होती त्यामुळे आमदार कुल हे स्वतः fb वर live येऊन त्यांनी आपण आता व्यवस्थित असल्याचे आणि लवकरच आपल्यात येत असल्याचे सांगून दौंडकरांना दिलासा दिला आहे.