लॉकडाउनच्या काळात तहान भागविण्यासाठी पक्षीप्रेमी सरसावला, एका अलवीयाचा स्तुत्य उपक्रम



सहकारनामा ऑनलाईन (विनोद गायकवाड)

– सध्या उन्हाच्या तिव्रतेत प्रचंड वाढ झाली आहे.वाढत्या उन्हामुळे प्राण्यांना पक्ष्यांना घोटभर पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागते,यावर उपाय म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सलगर खुर्द(ता.मंगळवेढा) या गावातील नागेश ज्ञानेश्वर व्हनवटे या पक्षीप्रेमीने घराच्या आवारातील झाडांवर पक्ष्यांसाठी वापरात नसलेल्या बाटल्या कापून त्याचे भांडे तयार करून पाण्याची व्यवस्था केली आहे.कोरोना व्हायरसने देशभरच नाही तर संपूर्ण जगभरात थैमान माजविले आहे,याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर लॉक डाउन असल्याने लोक घराबाहेर पडत नाही,त्यामुळे अनेक मुके प्राणी,पक्षी यांच्या खाण्या-पिण्याचे हाल होत असल्याचे चित्र आहे,यामुळे अनेक संस्था पुढे सरसावल्या असून गरजूंना तसेच मुक्या प्राण्यांना ढोबळ हाताने मदत करताना दिसत आहेत, यातच सोलापूर जिल्ह्यातील नागेश व्हनवटे या अलवियाने पाण्यावाचून पक्ष्यांचे हाल होऊ नये यासाठी आपल्या घरासमोर,झाडांवर वापरात नसलेल्या बाटल्या कापुन पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली आहे.

पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे राहणारे नागेश व्हनवटे हे कामानिमित्त आपल्या गावी सलगर खुर्द या ठिकाणी गेले होते,मात्र  देशभर लॉक डाउन जाहीर झाल्याने  त्यांच्या मूळ गावी सोलापूर जिल्ह्यातील सलगर खुर्द या ठिकाणीच थांबले, लॉक डाउन असल्याने कोणी घराबाहेर पडताना दिसत नाही,त्यामुळे ज्या ठिकाणी राहण्यास आहे तिथे पक्ष्यांच्या नेहमी किलबिलाट ऐकू येत असल्याने घराच्या समोरच असलेल्या झाडांवर पाणी व त्यांना खाण्यासाठी धान्याची सोय करून पक्ष्यांसाठी सोय करून आपण ही दिलेल्या आदेशाचे लॉक डाउनचे पालन करीत आपल्या घराच्या गॅलरी सभोवताली असे प्रयोग करून मुक्या पक्षी व प्राणी यांना पाणी व अन्न द्या असा एक संदेश या माध्यमातून दिला आहे.