FightAgainstCorona: आता ‛लोणीकाळभोर’सह वाघोली, लोणावळा आणि बारामतीवरही पोलिसांची ड्रोनद्वारे नजर



थेऊर : सहकारनामा(शरद पुजारी) 

– देशात एकवीस दिवसाचा संपूर्ण लाॅकडाऊन जाहिर झाल्यानंतर याची कठोर अमलबजावणी होते किंवा नाही यासाठी पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी ग्रामीण भागातील काही पोलिस स्टेशनच्या हद्दीत ड्रोन कॅमेर्याच्या सहाय्याने नजर ठेवत असल्याचे सांगितले आहे त्यामुळे कामाशिवाय रस्त्यावर भटकणार्यांची आता गय केली जाणार नाही हे निश्चित. यामध्ये बारामती लोणावळा वाघोली लोणी काळभोर या ठिकाणी विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस भयानक रुप धारण करत आहे यावर प्रत्येक नागरिकांनी आपापल्या घरात राहण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.त्यासाठी संपूर्ण देशात एकवीस दिवसाचा लाॅकडाऊन करण्याचे आदेश दिले.महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णाची संख्या देशात सर्वाधिक आहे अशावेळी राज्यातील नागरिकांनी शासनाला संपूर्ण सहकार्य करणे अपेक्षित आहे. राज्यातील जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत.अनेक सामाजिक संघटना पुढे येऊन गरीब व अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मदत करत आहेत. परंतु अनेक टवाळखोर विनाकारण गावात मोकाट फिरताना दिसतात त्यांच्यावर पोलिसांनी ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून नजर ठेऊन अशा टवाळखोरांना अद्दल घडवण्याचा निश्चय केला आहे.