मदतीचा दिखाऊपणा करणाऱ्यांवर होणार कारवाई, राज्यातील ‛या’ जिल्ह्यांमध्येही नियम लागू



: सहकारनामा ऑनलाईन.

 कोरोनाव्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांच्या रोजीरोटीचा मुद्दा ऐरणीवर आला होता यास हातभार लावण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, राजकीय नेते आणि  सामाजिक कार्यकर्ते गरजू लोकांना अन्नधान्य, किराना आणि विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांना दिलासा देण्याचे काम करत आहेत मात्र काही महाभाग असेही आहेत की फक्त आपले नाव वृत्तपत्र, वृत्तवाहिनी आणि सोशल मीडियावर चमकावे म्हणून मदतीचा आव आणत आहेत.



 मात्र आता अशा लोकांना जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला असून  मदत करतानाचे फोटो प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावर टाकल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. शिवाय गरजू लोकांना कुठलीही मदत वाटप करताना दोन पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास व मदत वाटप करतानाचे फोटो सोशल मीडियावर टाकल्यास फोटातील सर्व व्यक्तींवर कारवाई होणार आहे. अहमदनगरचे  जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

अनेकजण गरजू लोकांना मदत करत आहेत मात्र मदत देताना फोटो व व्हिडिओच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर स्वत:ची प्रसिद्धी केली जात असल्याचे निदर्शनास येत होते त्यामुळे मदतकार्याच्या आडून स्वत:ची प्रसिद्धी करून घेणाऱ्यांना आळा घालण्यासाठी अहमदनगरचे  जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आदेश जारी केले असून याबाबत नियमावलीही बनविण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बनवलेल्या नियमावलीनुसार कोणत्याही प्रकारची मदत वाटप करण्यापूर्वी नजीकच्या तहसील कार्यालय व पोलिस स्टेशन यांच्याकडून व्यक्तीगत व वाहनांचे पासेस घ्यावे लागणार आहेत, कुठल्याही परिस्थिती मदत वाटप करणारे व मदत घेणारे यांच्या व्यतिरिक्त कोणीही वाटप करताना उपस्थित नसावे. जे मदत वाटप करणार आहेत त्यांची संख्या दोन पेक्षा अधिक असू नये, अशा कुठल्याही प्रकारचे मदत वाटपाबाबतचे फोटो प्रसारमाध्यमे व सोशल मीडियाद्वारे प्रसारित करू नये,  मदत वाटप करताना दोन पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास व मदत वाटपाबाबतचे फोटो प्रसारमाध्यमे व सोशल मीडियाद्वारे प्रसारित केल्यास फोटोतील सर्व व्यक्तींवर भादंविच्या कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे