दारूच्या निर्णयावर अण्णा भडकले, सरकारच्या धोरणावर कडाडून टीका



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

देशात सध्या कोरोनामुळे मोठी बिकट परिस्थिती बनली आहे. राज्यामध्येही कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अजून बरीच कामे करणे बाकी असताना केवळ महसूल मिळण्यासाठी सरकारने दारू दुकाने सुरू करणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे अशी टीका  जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे.

राज्य सरकारच्या वाइन शॉप सुरू करण्याच्या निर्णयावर अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त करत या निर्णयाला विरोध असल्याचे सांगितले  आहे. अण्णांच्या मते दारू ही अत्यावश्यक गरज नाही त्यामुळे ती मिळाली नाही म्हणून लोक मरणार नाहीत तरीही सरकारने अचानक असे निर्णय का घ्यावा? असा प्रश्न करून या परिस्थितीमध्ये सरकार दारू विक्री करून काय साध्य करणार? असा प्रतिप्रश्न केला आहे. यातून ।मिळणाऱ्या महसुलापेक्षा यातून धोकाच जास्त असेल तर याचा काय उपयोग असेही त्यांनी विचारत दारू मिळत नसल्यानं लोक दारूपासून दूर होऊ लागली होती पण या निर्णयामुळे पुन्हा तेच सुरू झाले असून सरकारला यातून काय साध्य करायचे आहे असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला आहे