मुंबई : सहकारनामा ऑनलाइन.
औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून मोठ्या आरोप प्रत्यारोप होत असताना औरंगाबाद विमानतळाच्या नामांतराला महाविकास आघाडी सरकारने मान्यता दिली असून आता औरंगाबाद विमानतळाचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असं करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली.
विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले विमानतळाचे नामांतर करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मागणी होत आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेने देखील धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ असं नाव करण्याबाबत ठराव संमत केला आहे. तसंच लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावास मान्यता दिली असून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे तो पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.