थेऊर : सहकारनामा ऑनलाईन(शरद पुजारी)
पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असताना शहरालगतच्या गावात विशेषतः पूर्व हवेलीतील गावामध्ये याचा फैलाव होऊ नये म्हणून शासकीय यंत्रणा कामाला लागून प्रत्येक विभाग आपापली भूमिका चोख बजावत आहेत परंतु नागरिकांनी याकडे अधीक गांभिर्याने घेण्याची आवश्यकता असताना काही जण निष्काळजी दाखवत असल्याचे दिसत आहे. याचा परिणाम या गावामध्ये कोरोना रुग्णाच्या संख्येत होत असलेली वाढ होय. पूर्व हवेलीतील लोणी काळभोर येथे कदमवाकवस्ती ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कवडीपाट माळवाडी येथे एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू कोरोना संक्रमनातून झाल्याचे निष्पन्न झाले या महिलेच्या संपर्कात आलेल्या पंचवीस जणापैकी दोन जण पाॅजिटीव आले अन्य तेविस जणाचा अहवाल निगेटीव्ह आला. या अगोदरच ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून संपूर्ण गावातील नागरिकांची आरोग्य चाचणी घेण्यात आली त्यावेळी नागरिकांनी आपणास होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती देणे आवश्यक आहे. परंतु नागरिक भितीपोटी काही लक्षणे असली तरीही सांगत नाहीत त्यामुळे हा धोका अधिकच वाढण्याची शक्यता आहे. या अगोदर उरुळी कांचन येथील एका महिलेस कोरोनाची लागण झाली ती अन्य आजारावर लोणी काळभोर येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होती. तिच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातील तिघांना कोरोनाचे संक्रमण झाले. लोणी काळभोर आरोग्य केंद्राचे अधिकारी डाॅ दगडू जाधव यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की आपणास काही कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळली तर ताबडतोब आरोग्य केंद्राशी संपर्क करावा त्यामुळे वेळेत निदान करुन अन्य नागरिकांना याचा प्रादुर्भाव होणार नाही.या पुढील काळात अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे.नागरिकांनी आपापल्या घरातच रहावे बाहेर पडू नये शासनाला सहकार्य करावे.