दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
बहीण-भावाचा पवित्र सण रक्षाबंधन आज दौंड कोविड सेंटर मध्ये साजरा करण्यात आला. कोरोना महामारीमुळे सध्या सण, उत्सव साजरा करताना अनेक बंधने आहेत त्यामुळे सर्वांचाच आनंद हिरावला गेला आहे. कोरोना महामारीचा फैलाव व त्याच्या होणाऱ्या दुष्परिणामामुळे बाधित रुग्णां पासून तर सर्वच दूर पळत आहे अगदी रक्ताच्या नात्यातले यावेळी जवळ येऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.
मात्र, आज दौंड कोविड सेंटर मधील परिचारिकांनी या सर्व गोष्टींना छेद देत सेंटरमधील बाधित रुग्णांना राखी बांधून सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांच्या बहिणींची भूमिका निभावली त्यामुळे संतोषी वरुटे, रेणुका रेड्डी व शीला लेहने या परिचारिकांचे आणि त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.