थेऊर: सहकारनामा ऑनलाईन(शरद पुजारी)
– कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रत्येक गाव पातळीवर विशेष उपाययोजना आखल्या जात आहेत पूर्व हवेलीतील बहुतांश गावांनी आपापल्या सीमा बंद केल्या असल्या तरीही अनेक मोकाट टवाळखोराची रेलचेल कमी होत नाही यावर ग्रामपंचायत पातळीवर बैठक घेऊन कठोर कारवाई करण्यासंदर्भात सूचना केल्या असल्याने उद्या गुरुवार पासून केवळ दोन तासच दुकाने उघडी ठेवण्यात येणार आहेत. पुणे शहरात कोरोनाने धुमाकुळ घातल्याने शहरालगतच्या गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे यावर प्रत्येक नागरिकांनी आपापल्या घरात राहण्याचे आवाहन पंतप्रधान करण्यात आले आहे परंतु वेगवेगळ्या बहाण्याने अनेकजण मोकाट फिरताना दिसतात यावर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनास ठोस उपाय करण्याची सूचना देण्यात आली आहे. थेऊर मध्ये लाॅकडाऊनचा फजा उडाल्याचे चित्र होते विशेषतः नायगाव रस्त्यावर तर दुचाकी वाहनांची जणू स्पर्धा चालू असल्याचे दिसते.यात अनेकजण आपल्या मुलांकडे पुर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते यामुळे समाजाला काय किंमत मोजावी लागणार याची कल्पना कधी होणार. अशा बिकट प्रसंगात आपले हितसंबंध बाजुला ठेऊन कठोर शिक्षा होण्यासाठी सहकार्य करणे अपेक्षित आहे.
थेऊर ग्रामपंचायत कार्यालयाने एक बैठक घेऊन गावातील सर्व दुकाने केवळ सकाळी सात ते दहा या वेळेतच चालू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानंतर पूर्णपणे संचारबंदी लागू होईल या दरम्यान रस्त्यावर मोकाट फिरताना आढळून आल्यास पोलिस कडक कारवाई करणार आहेत