कोरोनामुळे आज दुपारपर्यंत पुण्यात झाला पाच जणांचा मृत्यू



पुणे : सहकारनामा ऑनलाईन 

संपूर्ण जगामध्ये धुमाकुळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे आज पुण्यामध्ये दुपारपर्यंत पाच जणांचा बळी घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हा देशात दिवसेंदिवस वाढतच असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे परंतु नागरिक अजूनही हवी तशी काळजी घेताना दिसत नाहीयेत. पुण्यात आत करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या आता १३ वर पोहचली आहे. आज सकाळी पुण्यातील नायडू रुग्णालयात हॉस्पिटलमध्ये एक नोबेलमध्ये एक आणि ससूनमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असल्याने आज दुपारपर्यंत मृतांचा आकडा पाच झाला असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. याबाबत नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे