दौंड शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच, दुचाकी चोरांची टोळीच शहरात सक्रिय असल्याचा संशय



|सहकारनामा|

दौंड : शहरातील विविध भागातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण  वाढत असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. 

मागील पंधरा दिवसांमध्ये शहरातील विविध भागातून तीन दुचाक्या चोरट्यांनी  लांबविल्या आहेत, त्यामुळे दुचाकी चोरांची टोळीच शहरात सक्रिय झाली असल्याचा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत. शहरातील अतिशय वर्दळीच्या ठिकाणाहून ही चोरटे दुचाक्या चोरून नेत असल्याने यांना पकडण्याचे  आव्हान दौंड पोलिसांसमोर आहे.

दि.23 मे रोजी शहरातील खाटीक गल्ली येथे राहणाऱ्या वाहिद कुरेशी यांची होंडा कंपनीची दुचाकी दि.5 जून रोजी शालिमार चौक येथील अतुल थोरात यांची होंडा कंपनीची दुचाकी दि.7 जून रोजी फराटे गल्ली येथे राहणाऱ्या सरफराज शेख यांची हिरो कंपनीची स्प्लेंडर,  चोरट्यांनी चोरून नेल्या असल्याची नोंद दौंड पोलीस स्टेशनला आहे. 

या दुचाकी चोरांना पोलिसांनी लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.