दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील यवत हे नेहमी विविध कारणांनी चर्चेत राहणारे गाव आहे.
आजही पुन्हा यवत गाव चर्चेत आले आहे, मात्र याला जुनेच कारण आहे. हे कारण 1 वर्षापूर्वीचे आहे. त्यामुळे यवतकरांसाठी आजचा दिवस काळा दिवस ब्लॅक डे म्हणून मानला जात आहे.
आजच्याच दिवशी पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात होऊन यामध्ये 9 युवकांचा मृत्यू झाला होता. तो दिवस म्हणजे शनिवार, 20 जुलै 2019 हा होता. या अपघातामध्ये अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महंमद आशपाक अत्तार, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत गिघे, दत्ता गणेश यादव व जुबेर अजित मुलाणी यांचा अपघाती मृत्यू झाला होता.
या अपघातानंतर यवत गावावर भयाण शोककळा पसरली होती. हा अपघात पुणे-सोलापूर महामार्गावर असणाऱ्या लोणी काळभोरजवळील कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीसमोर घडला होता. या अपघातात कारमधील नऊ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यास आज एक वर्ष पूर्ण झाले आहे, त्यामुळे यवतकर या दिवसाला blackday काळा दिवस म्हणून संबोधतात.