दौंड : शेती पंपाची सक्तीची विज बील वसुली थांबवुन शेतकऱ्यांचे संपुर्ण विज बील माफ करावे तसेच खंडित केलेला विज पुरवठा ताबडतोब पूर्ववत करावा या मागणीसाठी दौंड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने उद्या 2 मार्च रोजी केडगाव (दापोडी) महावितरण कार्यालय समोर आंदोलन करण्यात येणार असून यावेळी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत न केल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची सूचना दौंड तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माऊली ताकवणे यांनी दि. 25 फेब्रुवारी रोजी केडगाव विभागाचे उप अभियंता राजेंद्र एडके यांना निवेदन देऊन दिली होती. मात्र अजूनही परिस्थिती जैसे थेच असल्याने हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ताकवणे यांनी यावेळी केले आहे.