बिष्णोई गँगकडून खा.संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी ! सलमान आणि तुमचा कार्यक्रम फिक्स असल्याचा उल्लेख

पुणे : खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुसेवाला हत्याकांड घडवून आणणाऱ्या लॉरेन्स बिष्णोईचे नाव घेऊन ही धमकी देण्यात आली आहे. या धमकीमध्ये दिल्लीत आल्यावर एके 47 चा वापर करून मुसेवाला सारखी तुमची हत्या करु, तुम्ही हिंदू विरोधी आहात. सलमान आणि तुमचा कार्यक्रम फिक्स आहे असे म्हटले आहे.

याबाबत पुणे पोलिसांनी धमकी देणाऱ्या
राहूल तळेकर या व्यक्तीला खराडी येथून ताब्यात घेतले असून त्यास पुढील तपासासाठी आरोपी मुंबई पोलिसांकडे स्वाधीन करण्यात आले आहे.

खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यसरकावर आणि गृहमंत्र्यांवर कडक शब्दात टिका केली असून गृहमंत्रिपद झेपत नसेल तर राजीनामा द्या अश्या शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

योग्य चौकशी करु, धमकी देणारा दारूच्या नशेत होता अशी माहिती मिळतेय. सरकार, पोलिस शांत बसणार नाही.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस