दौंड : दौंड तालुका ऍडव्होकेट बार असोसिएशन च्या अध्यक्षपदा साठी झालेल्या निवडणुकीमध्ये ऍडव्होकेट सुरेश जाधव यांनी विजय मिळविला.
अध्यक्षपदाच्या वार्षिक निवडीसाठी सोमवारी मतदान झाले. बाकी पदांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या १४५ सदस्यांपैकी १३६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला त्यामध्ये १नोटा आणि २ मते बाद झाली.
वैध १३३ मतांपैकी ॲड. सुरेश जाधव यांना १०५ व ॲड. राजेंद्र भिसे यांना २८ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मावळते अध्यक्ष ॲड. उदय फडतरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिव ॲड. विष्णुपंत माने यांनी काम पाहिले. ॲड. माधव अवचर, ॲड.उमा कुलंगे, प्रीती बलदोटा यांनी निवडणूक प्रक्रियेत सहाय्य केले.
दौंड तालुका ॲडव्होकेट बार असोसिएशन दौंडची कार्यकारिणी पुढील प्रमाणे :-
उपाध्यक्ष ॲड.सपना अग्रवाल, सचिव ॲड. महेंद्र आवाळे, सहसचिव ॲड. अजित दोरगे, खजिनदार ॲड. विजय काकडे, ग्रंथपाल ॲड. सौम्या जेम्स.