बारामती : सध्या मोबाईल आणि इंटरनेटच्या आहारी जाऊन अनेकांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे की काय अशी शंका येते. मोबाईल मध्ये चित्रित केलेल्या फिल्म खऱ्या समजून आपणही तसाच प्रयत्न करावा असा विचार करून अनेकजण नरापासून नराधम बनू लागले आहेत. आणि त्यामूळे आपली अनैसर्गिक इच्छा पूर्ण करण्यासाठी मग ते कोणत्याही थराला जाऊन एखाद्याचा जीव सुद्धा घेण्याचा प्रयत्न करतील हे सांगता येत नाही.
अशीच एक घटना बारामती शहरामध्ये घडली असून पत्नी अनैसर्गिक संबंध करू देत नसल्याच्या रागातून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या नितीन आसाराम कांबळे या पतीवर बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नितीन आसाराम कांबळे (रा.साई रेसिडेन्सी, लक्ष्मीनारायणनगर कसबा, बारामती) हा त्याच्या पत्नीकडे अनैसर्गिक संबंधाची मागणी करत होता मात्र त्याची 35 वर्षीय पत्नी ही त्याची मागणी धुडकावून लावत असल्याने त्याने पत्नीला जीवे मारण्याचा कट रचला.
नितीन कांबळे याची पत्नी गाढ झोपेत असताना त्याने तीच्या पायाच्या दोन्ही अंगठ्यांना इलेक्ट्रिक वायर बांधून तिला करंट देऊन मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत या नराधम पतीच्या विरोधात पत्नीने फिर्याद दिल्याने बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक चेके हे करीत आहेत.