राज्यातील विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर, 20 नोव्हेंबरला निवडणूक अण दोन दिवसांत निकाल

पुणे : सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा आज करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी घोषणा करताना राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

राज्यात आचारसंहिता लागू 

राज्यातील विविध पक्ष, महाविकास आघाडी, महायुती या सर्वांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करण्यासोबत आजपासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होणार असल्याची घोषणा केली आहे.

प्रचाराची मुदत किती असणार

राज्यातील विधनासभा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून यावेळी निवडणूक प्रचारासाठी सुमारे महिनाभर वेळ मिळणार आहे. साधारण १८ नोव्हेंबरला प्रचार तोफा थंडावणार आहेत.