मुंबई : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी पडवी (ता. दौंड) येथील अजित दिलीपराव शितोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख आणि दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांच्या हस्ते अजित शितोळे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष (शरद पवार गट) खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
याप्रसंगी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा (शरद पवार गट) खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार श्रीनिवास पाटील, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, आमदार अशोक पवार, महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ टुले, सचिन काळभोर, चैतन्य पाटोळे, अजित आटोळे तसेच इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. अजित शितोळे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.