पुणे : सराफ व्यावसायिकांना लुटणारी सराईत टोळी जेरबंद करण्यात पुणे ग्रामिण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्याची उकल करत सहा लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचे तीन किलो चांदीचे दागिने आणि साडे आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कामगिरी पार पाडली आहे.
असे लुटले सराफाला
राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील शिवापूर वाडा गावचे हद्दीतील आकांक्षा ज्वेलर्स चे मालक यशवंत राजाराम महामुनी (रा. शिवापूर ता. हवेली जि. पुणे) हे दि. ०५/११/२०२३ रोजी ररात्री ०९/०० वाजता दुकानातील सोने-चांदीचे दागिने घेवून घरी जात होते. त्यावेळी कोंढणपूर रोडवर दोन पल्सर मोटार सायकलवर आलेल्या अनोळखी इसमांनी त्यांना धक्काबुक्की करून जबरदस्तीने त्यांच्याकडील ६ लाख ५८ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. त्याबाबत त्यांनी राजगड पो स्टे येथे फिर्याद नोंदवली होती.
अश्या प्रकारे करण्यात आला तपास
सदर गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखा करत असताना त्यांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. सलग दहा दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आल्यानंतर गुन्हा करून आरोपी हे त्यांच्याकडील दोन पल्सर मोटार सायकलवरून शिवापूर – राठवडे – आंबवणे मार्गे कापूरहोळ बाजूकडे गेल्याचे आढळून आले. परंतु अनोळखी आरोपींची ओळख पटलेली नसल्याने गुन्हा उघडकीस आणणे हे पोलीसांसमोर आव्हान होते.
खबऱ्यांच्या मदतीने पोलीस पथक चोरांपर्यंत पोहोचले.. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आजूबाजूच्या परीसरातील गोपनीय खबऱ्यांना सतर्क केले तसेच रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची माहिती प्राप्त करण्यास सुरूवात केली असता सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार १) निलेश पांडुरंग डिंबळे (रा. कल्याण ता. हवेली जि पुणे) याने त्याचे साथीदार २) रोहित साठे (रा. सहाकारनगर,आण्णभाऊ साठे वसाहत नं २ पुणे) ३) निखिल कांबळे (रा. लेन नं. ०६, बिबवे नगर, अप्पर पुण ४) साहील पटेल (रा.आंबेडकर वसाहत लक्ष्मीनगर पुणे) ५) निलेश दशरथ झांजे, (रा. वडगाव झांजे ता. हवेली जि पुणे) व इतरांचे मदतीने केला असल्याची खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी त्यांचा शोध घेवून आरोपी १) रोहित ऊर्फ बाबा प्रकाश साठे २) निखिल भगवंत कांबळे ३) निलेश दशरथ झांजे, (वय २५ वर्षे, रा. वडगाव झांजे, भैरवनाथ मंदिराजवळ, ता वेल्हे जि पुणे) ४) शफीक मकसुद हावरी (वय १९ वर्षे रा. निलकमल सोसायटी इंदीरानगर कुंभारवाडा) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचेकडून गुन्हयातील चोरी गेलेले साडे आठ तोळे वजनाचे सोन्याचे व तीन किलोग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण ६ लाख ५८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.
पथकाची दमदार कामगिरी
सदरची कामगिरी पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड चे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि नेताजी गंधारे, पो. स.ई. प्रदीप चौधरी, अभिजीत सावंत, पोलीस अंमलदार प्रकाश वाघमारे, सचिन घाडगे, राजू मोमीण, अतुल डेरे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, विक्रम तापकीर, विजय कांचन, अजित भुजबळ, राहुल घुबे, दत्ता तांबे, निलेश शिंदे, अमोल शेडगे, तुषार भोईटे, मंगेश भगत, धिरज जाधव, अक्षय सुपे यांनी केली आहे.
आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये असून पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे पो नि आण्णासाहेब घोलप, सपोनि नितीन खामगळ, पोलीस अंमलदार राहुल कोल्हे हे करत आहेत.