दौंड : दौंड तालुक्यातील नांदूर येथून पत्नीने पतीच्या घरातून रोकड आणि दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत पतीने फिर्याद दिल्याने पत्नी आणि अन्य एकावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार नांदुर गावच्या हद्दीत असणाऱ्या चिंतामणी कंपनीसमोर फिर्यादी विठ्ठल मल्हारी थोरात यांचे घर आहे. त्यांच्या राहत्या घरामधुन त्यांची पत्नी मनिषा विठठल थोरात आणि दुर्गेश हिरालाल कोल (रा नांदुर ता दौंड जि पुणे) यांनी संगनमत करून घरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत त्यांनी घरात ठेवलेल्या कपड्याच्या पिशवीतील 2 लाख रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागीने असे एकूण 3 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्या संमतीशिवाय लाबाडीच्या इराद्याने चोरी करून नेला असल्याचे त्यांनी फिर्यादित म्हटले आहे.
या चोरीमध्ये 2 लाख रुपये रोख आणि दीड तोळा वजनाचे सोन्याचे मीनीगंठण, एक तोळ्याचा काळया मन्यातील गंठन व एक तोळा वजनाचे कानातील वेल व डोरले असे 1 लाख 20 हजारांचे दागिने मिळून एकूण 3 लाख 20 हजार रुपयांची चोरी करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोह.भोर करीत आहेत.