CRIME NEWS – आधी 17 वर्षीय मुलाचे अपहरण नंतर हातपाय बांधून रेल्वेखाली टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न, ‘केडगाव’ येथील धक्कादायक प्रकार

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे एका 17 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्यास रेल्वेगाडखाली टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश शिवाजी शेळके (वय 43, धंदा नोकरी, रा.केडगाव स्टेशन, शिंदे हॉस्पिटल ता.दौंड) यांचा मुलगा शुभम शेळके याचे आरोपी बाळासाहेब उर्फ महेंद्र सोडणवर (रा.केडगाव,पिसेवस्ती ता.दौंड, पुणे) आणि बाळासाहेब भागुजी रुपणवर (रा.दापोडी, ता.दौंड) या दोघांनी एका विशिष्ट कारणावरून शुभम शेळके यास मारहाण केली त्यानंतर त्याचे स्कॉर्पिओ एम. एच. 42 – ए.डी. 8055 यामध्ये बसवून त्याचे अपहरण केले. तसेच त्याचे हातपाय बांधून त्यास जीवे मारण्याच्या उद्देशाने रेल्वे गाडीखाली फेकून देण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप शुभम शेळके यांनी आपल्या फिर्यादित केला आहे.

त्यांच्या फिर्यादीवरून वरील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि लोखंडे हे करीत आहेत.