पुणे : मुस्लिम सेवा संघाच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षपदी आफरीन अझीम पानसरे यांची निवड करण्यात आली आहे. त्या पुणे जिल्ह्यातील केडगाव (आंबेगाव ता. दौंड) येथील रहिवासी आहेत. त्यांना राष्ट्रीय मुस्लिम सेवा संघाच्या अध्यक्षा सायरा शेख यांच्यावतीने नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.
मुस्लिम सेवा संघाने आफरीन अझीम पानसरे यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करताना आपण तन, मन, धन आणि सचोटीने मुस्लिम सेवा संघाच्या कार्याचा विस्तार करून समाज आणि देशाला अभिमान वाटेल असे कार्य कराल असे म्हटले आहे. तसेच तुमची नियुक्ती
पुणे जिल्हाध्यक्ष कार्यकारिणी आणि अध्यक्षांच्या परवानगीने तुम्हाला या पदाचा कार्यभार देण्यात आला असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे म्हटले आहे.
आफरीन अझीम पानसरे यांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामिण भागामध्ये विविध सामाजिक उपक्रमात आपला हातभार लावला असून त्या आणि त्यांचे पती अझीम पानसरे हे सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असतात. नुकतेच त्यांनी केडगाव (आंबेगाव) येथे रक्तदान शिबीर घेऊन ते यशस्वी केले होते. आफरीन पानसरे यांची पुणे जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.