– सहकारनामा
दौंड : दौंड तालुक्यामध्ये सध्या कोरोनाने आपले जाळे चांगलेच पसरविल्याचे दिसत आहे. सध्या ग्रामिण भागासह शहरातही कोरोना रुग्ण सापडत असून आज दि.17 एप्रिल रोजी नव्याने 54 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
एकूण 221 रुग्णांची चाचणी हि दौंड उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली होती. त्यापैकी 54 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले तर 167 जण निगेटिव्ह आले आहेत. याबाबतची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ इरवाडकर यांनी दिली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 38 पुरुष आणि 16 महिला आहेत. तर त्यांचा विभाग खालील तक्त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे.