दौंड तालुक्यातील ग्रामिण भागामध्ये आज 80 जणांना कोरोनाची बाधा, जाणून घ्या कोणत्या गावात किती रुग्ण



| सहकारनामा |

दौंड : दौंड तालुक्यातील ग्रामिणभागामध्ये कोरोनाचा फैलाव जास्त प्रमाणात होताना दिसत आहे. दौंड तालुक्यातील यवत आणि स्वामी चिंचोली कोविड सेंटरच्या आजच्या दि.19 एप्रिल रोजी आलेल्या अहवालामध्ये 80 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर आज कोरोनातुन मुक्त झालेल्यांची संख्या 27 आहे.

दौंड तालुक्यातील यवत, केडगाव, वरवंड आणि पाटस हि गावे अजूनही रुग्णांच्या बाबतीत पुढेच असून या सर्व गावांमध्ये सध्या कडक निर्बंध जारी करण्यात आलेले आहेत.



आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण आणि त्यांची गावे वरील तक्त्यामध्ये नमूद करण्यात आली आहेत. नागरिकांनी आता स्वतः काळजी घेऊन गर्दीची ठिकाणे, बाहेरील संचार टाळणे गरजेचे बनले आहे.