Daund : खडकी पंचायत समिती गणातील ग्रामपंचायतींनी घेतली स्वतःची रुग्ण वाहिका



| सहकारनामा |

दौंड : खडकी पंचायत समिती गणातील ग्रामपंचायतींनी एकत्रित येऊन तातडीच्या वेळप्रसंगी सोय व्हावी या उदात्त हेतूने रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता, आज त्यास यश आले आहे.

या रुग्णवाहिकेचा लोकार्पण व पुजन समारंभ आज दि.20 एप्रिल रोजी पार पडला. खडकी पंचायत समिती गणातील ग्रामपंचायतींच्या वतीने हा अतिशय गौरवशाली असा हा निर्णय असून प्रत्येक  गावाच्या हिताच्या दृष्टीने टाकण्यात आलेले महत्वपूर्ण पाऊल म्हणावे लागेल. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून ऐनवेळी कोणत्याही रुग्णासाठी ही रुग्णवाहिका जीवनदायी ठरेल यात शंका नाही.  

या प्रसंगी खडकीच्या सरपंच स्नेहल संजय काळभोर, मा.जिप सदस्य संजय काळभोर, सरपंच राहुल गुणवरे, ग्रा.सदस्य मोहन काळभोर, जनार्दन कुदळे, आकाश शिंदे व दत्तात्रय शितोळे, अनिल गुणवरे उपस्थित होते.