| सहकारनामा |
दौंड : दौंड तालुक्यातील पाटसमध्ये एक 35 वर्षीय महिला आणि तिच्या 7 वर्षीय मुलाचा मृतदेह घरामध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक घाडगे यांनी दिली आहे.
लीना सचिन सोनवणे आणि ओम सोनवणे अशी या मृत मायलेकरांची नावे असून लीना सोनवणे या पाटस येथील स्वराज सोयासायटी येथे राहत होत्या, त्यांचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय होता. त्यांनी आत्महत्या केली की घातपात झाला याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असुन मृत महिलेच्या नातेवाईकांनी मात्र घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज मंगळवार दि.27 एप्रिल रोजी मृत लीना सोनवणे यांची 10 वर्षीय मुलगी वैष्णवी हि सकाळी झोपेतून उठली असता तिला तिचा भाऊ ओम हा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला त्यावेळी तिने घाबरून आईला शोधण्याचा प्रयत्न केला असता तिचाही मृतदेह किचनमध्ये लटकलेल्या अवस्थेत तिला आढळून आल्याने तिने याची माहिती आपल्या आजी आजोबांना फोन करून दिली.
या घटनेबाबत मृत लीना सोनवणे यांचा भाऊ भाऊसाहेब मारुती शेलार (रा.केडगाव, ता.दौंड) यांनी पाटस पोलीस स्टेशन मध्ये खबर दिली असुन या घटनेचा अधिक तपास यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे हे करीत आहेत.