Corona Update – दौंड शहरामध्ये 236 पैकी 61 जण पॉझिटिव्ह तर 175 जम निगेटिव्ह



| सहकारनामा |

दौंड : दौंड शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असून हि एक समाधानाची बाब समजली जात आहे.

आज दि. 27 एप्रिल रोजी दौंड शहरातील 236 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये 61 जण पॉझिटिव्ह आले आहेत तर 175 जण निगेटिव्ह आले आहेत. 



पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 36 पुरुष आणि 25 महिलांचा समावेश असल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.

पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे खाली दिलेल्या विभागातील आहेत (तक्ता पहा)





नागरिकांनी कोरोनापासून बचाव होण्यासाठी आणि कोरोनाची चैन तोडण्यासाठी घरातच रहावे, मास्क घालावे, हात वारंवार साबणाने स्वच्छ करावेत आणि कोणतीही लक्षणे दिसल्यास जवळील रुग्णालयात त्वरित जावे असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आले आहे.