Big Breaking News : पाटस येथील 7 वर्षीय मुलगा आणि त्या महिलेचा खूनच! पतीनेच मुलगा आणि पत्नीचा खून केल्याचे तपासात निष्पन्न, यवत पोलिसांनी एक दिवसातच लावला छडा



| सहकारनामा |

दौंड : दौंड तालुक्यातील पाटसमध्ये 7 वर्षीय मुलगा आणि त्याच्या आईचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून हा खून खुद्द त्या मुलाच्या बापाने आणि महिलेच्या पतीनेच केल्याचे यवत पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एका दिवसातच खुनाचा छडा लावण्यात आणि आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सचिन सोनवणे असे त्या मुलाचा  निर्दयी बाप आणि त्या महिलेच्या पतीचे नाव असून त्याला यवत पोलिसांनी जेरबंद केले आहे.

पाटस मध्ये राहत्या घरात एक 35 वर्षीय महिला आणि तिचा 7 वर्षीय मुलाचा मृतदेह घरामध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ माजली होती.

लीना सचिन सोनवणे आणि ओम सोनवणे असे मृत माय लेकरांची नावे होती. 

हि आत्महत्या आहे की घातपात याबाबत पोलिसांकडून तपास सुरू होता. महिलेच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता.

असा झाला खूनाचा उलगडा..

सचिन सोनवणे हा आपल्या पत्नीचा खून करत असताना त्यास त्याचा मुलगा ओम याने पाहिले होते, त्यामुळे त्याने त्याचाही खून केला तर मुलगी वैष्णवी हिने मी कुठेही काही बोलणार नाही असे सांगितल्याने तिचा जीव वाचला.

यवत पोलिसांनी या घटनेचा शिताफीने तपास करत मुलीला विश्वासात घेतले त्यावेळी तिने हे दोन्ही खून तिचे वडील सचिन सोनवणे आणि तिच्या सोबत असणाऱ्या तिच्या प्रेयसिने केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्वरित सूत्रे हलवत सचिन सोनवणे या निर्दयी आणि क्रूर खुन्याला जेरबंद केले तर तिच्या प्रेयसीचा शोध सुरू आहे.

मंगळवार दि.27 एप्रिल रोजी मृत लीना सोनवणे यांची 10 वर्षीय मुलगी वैष्णवी हि सकाळी झोपेतून उठली असता तिला तिचा भाऊ ओम हा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला त्यावेळी तिने घाबरून आईला शोधण्याचा प्रयत्न केला असता तिचाही मृतदेह किचनमध्ये लटकलेल्या अवस्थेत तिला आढळून आला होता.

या घटनेबाबत मृत लीना सोनवणे यांचा भाऊ भाऊसाहेब मारुती शेलार (रा.केडगाव, ता.दौंड) यांनी पाटस पोलीस स्टेशन मध्ये खबर दिली होती.