| सहकारनामा |
दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव आणि यवत परिसरात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे.
दि.26 एप्रिल रोजी चा अहवाल आज प्राप्त झाला आहे.
यवत ग्रामिण रुग्णालयात एकूण 208 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते त्यापैकी 87 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले तर 121 जण हे निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 53 पुरुष आणि 34 महिलांचा समावेश असून त्यांचे वयोगट हे 6 महिने ते 69 या दरम्यान आहे.
पॉझिटिव्ह आलेले रुग्ण आणि त्यांची गावनिहाय आकडेवारी खालील प्रमाणे आहे.
केडगाव 11, यवत 07, राहू 06, मिरवडी 01, देलवडी 01, भरतगाव 03, पिंपळगाव 02, दहिटने 07, भांडगाव 05, खामगाव 07, बोरीपार्धी 04, पाटस 05, नानगाव 03, नागरगाव 02, सुपा 01, नाथाचीवाडी 02, वडगाव 10, कासुर्डी 01, गलांडवाडी 01, वाखारी 02, वरवंड 03, खोर 01, पडवी 01, चौफुला 01, खुटबाव 01,