Shirur Firing – शिरूर गोळीबार प्रकरणातील NK साम्राज्य ग्रुपचा ‛मोक्का’तील कुख्यात आरोपी बाबू कुर्लपसह 6 जण ‛LCB’ कडून जेरबंद



| सहकारनामा |

पुणे :

पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे भरदिवसा गोळीबार (firing) करून फरार झालेला मोक्कातील आरोपी बाबू उर्फ मुकेश चंद्रकांत  कुर्लप आणि त्याच्या इतर 5 साथीदारांना पुण्यातून जेरबंद करण्यात पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे अन्वेषण (LCB) विभागाला यश आले आहे. 

सदर आरोपीवर शिरुर पो.स्टे. गु.र.नं. ५९/२०२१ भा.वि.का.क. ३०७, १२०(ब) इतर सह मौका अॅक्ट प्रमाणे दाखल असलेने. सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तपास पथकाकडून करणेत येत होता. 

या गुन्हयातील आरोपी बाबू उर्फ मुकेश चंद्रकांत कुर्लप हा प्रसाद सुनील यादव (रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड पुणे) याचेकडे राहणेस असून त्याने त्याला आसरा दिला आहे अशी खात्रीशीर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. 

गुप्त माहितीचे आधारे व तांत्रिक विश्लेषणाचे आधारावर LCB पथकाने प्रसाद सुनील यादव यास भेटून त्याचेकडे चौकशी केली असता आरोपी बाबू उर्फ मुकेश चंद्रकांत कूर्लप हा नमुद गुन्ह्यात फरार असल्याचे माहिती असताना देखील प्रसाद सुनील यादव याने आरोपीस गुन्हा घडलेनंतर फरार राहणेसाठी त्याचे घरी आसरा देवून सहाय्य केले होते व सध्या प्रसाद सुनील याने आरोपी बाबू उर्फ मुकेश चंद्रकांत कूर्लप याला शेजवळ पार्क, चंदननगर पुणे येथे प्रसाद सुनील यादव व बाबु उर्फ मुकेश कुर्लप या दोघांच्या मित्राचे खोलीत आसरा देवून लपवून ठेवले असून आरोपी बाबू उर्फ मुकेश कुर्लप हा गुन्ह्यामध्ये फरार असून त्याला आसरा देवून लपवून ठेवा असे त्यांचे मित्रांना सांगितले असल्याचे कबुल केले. 

त्या अनुषंगाने चंदननगर शेजवळ पार्क परीसरातील लतिका निवास इमारतीत आरोपी

1) बाबु उर्फ मुकेश चंद्रकांत कुर्लप (वय 31 वर्षे , रा.कामाठीपुरा,शिरूर ता.शिरूर जि.पुणे) या आरोपीस Lcb ने ताब्यात घेतले. या आरोपीवर पुढीलपैकी गुन्हे दाखल आहेत.

1) शिरूर पो. स्टे. Cr.no.33/2013, IPC 307,341,141,142,143,147,148,504,506

2) शिरूर पो. स्टे.Cr.no. 355/2013, IPC 326,143,147,149,504,506

3) शिरूर पो. स्टे.Cr.no. 59/2021, IPC 307,143,147,148,149,341,120(B),109, Arm Act 3,4,25,27 सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1)(ii),3(4)

तसेच या कारवाईत सापडलेल्या त्याचे साथीदार आरोपी

२) बाबु उर्फ परशुराम मन्छिद्र म्याकल (वय २१ वर्षे रा. कामाठीपुरा, शिरूर ता. शिरूर जि. पुणे) या आरोपीवर खालील पैकी गुन्हे दाखल आहेत.

1) हडपसर पो. स्टे. Cr.No 337/2019, IPC 399,402, म.पो.का.क 37(1)(3),135, Arm Act 3,4,25

आरोपी 

३) शुभम दत्तात्रय दळवी (वय २५ वर्षे, रा. प्रितमप्रकाश नगर, गणेश मंदिरामागे शिरूर ता. शिरूर जि.पुणे) या आरोपीवर पुढील गुन्हे दाखल आहेत.

1) शिरूर पो.स्टे Cr.no 440/2016, IPC 143,147,148,149,324,504,506

2) शिरूर पो. स्टे. Cr.no 633/2018, IPC 307,324,232,504,506,34

3) शिरूर पो. स्टे Cr.no 225/2016,IPC 506,143,147,149.

 आरोपी 

४) शुभम नरेश सिंग (वय २४ वर्षे, रा. गुजरमळा, माउली हॉस्पिटल समोर, शिरूर ता शिरूर जि.पुणे)

 आरोपी 

५) अमोल हनुमंत करजुले (वय २४ वर्षे, रा. बाबुरावनगर, शिरूर ता. शिरूर, जि. पुणे) 

आरोपी

६) प्रसाद सुनील यादव, (वय ३१ वर्षे रा तजवी भुसारी कॉलनी, यादव निवास बिल्डाग प्लॉट नं. १८२, फ्लॅट नं. ०९ कोथरुड पुणे) या सर्व आरोपींना ताब्यात घेऊन वरील सर्व आरोपींना शिरूर पो. स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामिण चे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, मिलिंद मोहिते अप्पर पोलिस अधीक्षक, राहुल धस उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड, यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट, सहा.पो. नि सचिन काळे, पो.स.ई अमोल गोरे,पो.स.ई रामेश्वर धोंडगे, म.पो.स.ई M.S देशमुख,सहा.फौ दिलीप जाधवर, सहा.फौ दत्तात्रय जगताप,सहा.फौ राजेंद्र थोरात, पो.हवा मुकुंद आयचीत, पो.हवा सागर चंद्रशेखर, पो.हवा विद्याधर निचीत, पो.हवा प्रमोद नवले, पो.हवा मुकुंद कदम,पो.ना राजू मोमीन, पो.ना अजित भुजबळ, पो.ना मंगेश थिगळे, पो.ना गुरू जाधव, पो.ना नितीन भोर, पो.कॉ अक्षय नवले, पो.कॉ प्रसन्नजीत घाडगे, म.पो.कॉ पुनम गुंड, म.पो.कॉ सुजाता कदम यांनी केली