Breaking News | केडगावच्या पंडिता रमाबाई मुक्तीमिशन येथे ‛तीन’ गतिमंद मुलींवर ‛बलात्कार’

अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव-बोरीपार्धी येथे असलेल्या पंडिता रमाबाई मुक्ती मिशन, केडगाव येथील ‛तीन’ गतिमंद मुलींवर मुक्ती मिशन मध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या एका मजुराने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

याबाबत यवत पोलीस स्टेशन येथे त्यानुषंगाने तीन वेग वेगळ्या FIR दाखल करण्यात आल्या असून त्यातील आरोपी मोझेस सुभाष झोरे, (35 वर्षे, रा. केडगाव ता. दौंड) यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उप-विभागीय पोलीस अधिकारी दौंड श्री स्वप्नील जाधव हे करत आहेत. आरोपीवर कलम 376 (2) (l), (n) नुसार कारवाई करण्यात आली आहे.

केडगाव या ठिकाणी रमाबाई मुक्ती मिशन ही मोठी सामाजिक संस्था असून या संस्थेमध्ये अनेक मूकबधिर, निराधार मुलींना आधार देऊन त्यांचा सांभाळ करण्यात येतो. मात्र या सामाजिक संस्थेमध्ये असले भयानक आणि मनाला चीड आणणारे कृत्य घडले असल्याने परिसरात संतप्त प्रतिक्रया उमटू लागल्या आहेत. अधिक माहिती लवकरच अपलोड करीत आहोत.