| सहकारनामा |
पुणे :
शिरूर पोलीस स्टेशन गु.रजि.नं. 59/2021, भा.दं.वि.कलम 307,143,147,148,149, 341, 120(ब), 109, आर्मस् अॅक्ट कलम 3,4,25,27, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कलम 3(1)(पप), 3(4) या गुन्हयातील फिर्यादी श्री. प्रविण गोकुळ गव्हाणे यास एन.के.साम्राज्य टोळीतील गोपाळ संजय यादव, शुभम सतिश पवार, अभिजीत उर्फ जपानी कृष्णा भोसले, शुभम विजय पांचाळ, निशांत भगवंत भगत, अदित्य औदुंबर डंबरे, शुभम उर्फ बंटी किसन यादव, राहुल अनिल पवार, महेंद्र येवले, निलेश उर्फ नानु चंद्रकांत कुर्लप, गणेश चंद्रकांत कुर्लप, मुकेश उर्फ बाबु चंद्रकांत कुर्लप यांनी कट करून भररस्त्यात सायंकाळचे वेळी गोळीबार करून व कोयत्याने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
त्यामध्ये एन.के.साम्राज्य टोळीचा म्होरक्या निलेश उर्फ नानु चंद्रकांत कुर्लप हा गुन्हा केल्यापासून फरार राहीला होता.
गुन्हयाचे तपासादरम्यान सदर टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हयातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करणेकामी मा. पोलीस अधीक्षक डाॅ.श्री. अभिनव देशमुख, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. मिलींद मोहीते, बारामती विभाग, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस यांनी पोलीस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांना सुचना दिल्या होत्या त्यानुसार पो.नि.श्री. घनवट यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील स.पो.नि.श्री. सचिन काळे, पो.ना.राजु मोमीन, पो.ना.अजित भुजबळ, पो.ना.गुरू जाधव, पो.ना.मंगेश थिगळे यांचे पथक तयार केले होते.
सदर गुन्हयाचे समांतर तपासात असताना निलेश उर्फ नानु चंद्रकांत कुर्लप हा दिल्ली येथे पळून जावून लपून बसला आहे अशी गोपनीय बातमीदारांकडून बातमी मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एन.के.साम्राज्य टोळीचा म्होरक्या निलेश उर्फ नानु कुर्लप यास दिल्ली येथून ताब्यात घेवून पुढील कार्यवाहीकरीता शिरूर पोलीस स्टेशन येथे हजर केलेले आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस साो., दौंड विभाग, दौंड हे करीत आहेत.
आरोपी नामे निलेश उर्फ नानु चंद्रकांत कुर्लप, रा. कामाठीपुरा, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे याचेविरूध्द दाखल गुन्हयांची माहीती खालीलप्रमाणे.
1) शिरूर पोलीस स्टेशन गु.रजि.नं. 188/2010, भा.दं.वि.कलम 324,504,506, 147, 148, 149
2) शिरूर पोलीस स्टेेशन गु.रजि.नं. 33/2013, भा.दं.वि.कलम 307,341,141, 142,143,147,148,504, 506
3) शिरूर पोलीस स्टेशन गु.रजि.नं. 355/2013,भा.दं.वि.कलम 326,143 147, 149, 504,506.
4) शिरूर पोलीस स्टेशन गु.रजि.नं. 473/2014,भा.दं.वि.कलम 324, 143, 147, 148, 323, 506
5) शिरूर पोलीस स्टेशन गु.रजि.नं. 97/2016, भा.दं.वि.कलम 324,341,323 427,504,506,143, 147,148,149
6) शिरूर पोलीस स्टेशन गु.रजि.नं. 225/2016, भा.दं.वि.कलम 143,147, 149,506
7) शिरूर पोलीस स्टेशन गु.रजि.नं. 440/2016,भा.दं.वि.कलम 324,504, 506,143,147, 148,149.
8) शिरूर पोलीस स्टेशन गु.रजि.नं. 514/2016, भा.दं.वि.कलम 302,34, 120 (ब),