संभाजीनगर : गेल्या अनेक महिन्यांपासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या जुलै महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती संभाजीनगर येथे पत्रकारांना बोलताना दिली आहे.
अनेक महिन्यांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या प्रश्नाचे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले असून त्यामुळे आता मंत्रिमंडळात कुणाकुणाची वर्णी लागते आणि कोणत्या खात्याची संधी कुणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
पुणे जिल्ह्यात सध्या पुणे ग्रामिण मधून आमदार राहुल कुल आणि शहरी भागातून आमदार महेश लांडगे आणि माधुरी मिसाळ यांची नावे चर्चेत असल्याची माहिती गुप्त सूत्रांकडून मिळत आहे.