राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त रावणगाव येथील 100 महिलांना मोफत अष्टविनायक दर्शन

मंगेश गाढवे

रावणगाव : राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त रावणगाव येथील 100 महिलांसाठी मोफत अष्टविनायक दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

रावणगाव येथिल सामाजिक कार्यकर्ते निलेश रंगनाथ पोमणे यांच्या नेतृत्वाखाली रावणगाव तसेच पंचक्रोशीतील महिलांची मोफत अष्टविनायक दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही अष्टविनायक दर्शन यात्रा 4 जून आणि 5 जून अशी दोन दिवस चालणार आहे. सर्व भाविक महिलांची भोजन आणि राहण्याची सोय संयोजकांतर्फे मोफत करण्यात आली आहे.

अष्टविनायक दर्शनासाठी संजय गाढवे, संतोष (बाळू)सांगळे, अंबादास आटोळे, हरिभाऊ कांबळे, तानाजी गावडे, अक्षय पानसरे, दिनकर आटोळे , रवींद्र गाढवे, वैभव पोपट आटोळे , वैभव पांडुरंग आटोळे, शरद आटोळे , कुमार चव्हाण, योगेश कोकणे जितेंद्र वसंत नेमाडे, आप्पा भोपाळ, बबन कांबळे, स्वप्निल पवार, शिवाजी हरीभाऊ आटोळे, गणेश साळवे, संग्राम भोपाळ इत्यादींचे विशेष सहकार्य लाभले आहे.