दौंड : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने येथील सदभावना सामाजिक सेवा प्रतिष्ठाण च्या वतीने रक्तदान व कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. मा.आमदार रमेश थोरात व रेव्ह.फा. डेनिस जोसेफ यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे, ज्येष्ठ नगरसेवक बादशहा शेख,इंद्रजीत जगदाळे, नंदू पवार, फिलिप अँथोनी तसेच नगरसेवक विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.55 रक्तदात्यांनी रक्तदान केले,215 जणांचे शिबिरामध्ये लसीकरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष जॉन फिलीप यांच्या मार्गदर्शनाने संस्था गेली 22 वर्ष अखंडपणे रक्तदान व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत आहे.
संस्थेचे बबलू नाईक, सचिन रोडे,हनीफ शेख, ओएस डायस, योगेश कांबळे, गजानन शिंदे, फ्रान्सिस अँथोनी, दादामिया मन्यार, विनोद गिदवाणी यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
जॉन फिलीप यांनी रक्तदात्यांचे व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.