दौंड : दौंडचे भाजप आमदार राहूल कुल यांनी दौंडमध्ये इफ्तार पार्टीला हजेरी लावत मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.
सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. या रमजानच्या महिन्यामध्ये मुस्लिम बांधव उपवास (रोजा) ठेवत असतात. रोजा ठेवणाऱ्या मुस्लिम बांधवांची सेवा करून पुण्य मिळावे या उद्देशाने रोजा सोडताना इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते. अश्याच इफ्तार पार्टीचे आयोजन दौंड चे सामाजिक कार्यकर्ते अकबर सय्यद व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.
या इफ्तार पार्टीला भाजप आमदार राहुल कूल, मा.नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, मा. उपनगराध्यक्ष फिलिप अँथोनी, आरपीआयचे पदाधिकारी सतीश थोरात, मा. नगरसेवक राजेश गायकवाड तसेच स्थानिक पत्रकार आदींनी इफ्तार पार्टीमध्ये सहभाग नोंदविला. यावेळी उपस्थितांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. आयोजकांच्या वतीने यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.